शहिदांची आठवण
शहिदांची आठवण
देशाच्या स्वातंत्र्यासाठी
प्राणाची आहुती दिली
भगतसिंग सुखदेव राजगुरू
लाहोर तुरुंगात फाशी दिली
मृत्यूला सामोरे जाताना
कोणीही डगमगले नाही
उलट स्वातंत्र्याचा दिला संदेश
मृत्यू वाया जाणार नाही
भारतावर त्यांचे थोर उपकार
नाव घेताना येते स्फूर्ती
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या
कार्याने पसरली जगभर कीर्ती
शहिदांचा आज आहे स्मृतिदिन
कार्यांची आठवण करूया
यांच्यामुळे मिळाले स्वातंत्र्य
त्यांच्या कार्याला नमन करूया
