शहिदांचे स्मरण
शहिदांचे स्मरण
15 ऑगस्ट 1947 चा
तो सोनियाचा क्षण
पारतंत्र्यातून मिळाला
आम्हाला स्वातंत्र्य दिन
जुलमी इंग्रजांच्या विरोधात
लढले टिळक गांधी नेहरू
तेंव्हा कुठे लाभले स्वातंत्र्य
दिवस आम्ही कसे विसरू
जनता होती अडाणी दरिद्री
तिला कळत नव्हते काही
जनजागृती व्हावी म्हणून
जनतेची चळवळ उभी केली
भगतसिंग,राजगुरू व सुखदेव
शहीद झाले या देशासाठी
बाबू गेनू ही शहीद झाला
स्वदेशी वस्तू वापरासाठी
आम्हाला असे ज्ञान
या स्वातंत्र्य दिनाची
आम्हांला आहे जाण
या क्रांतीकारकांची
डोळ्यात तेल घालूनी सैनिक
करतो भारत देशाचे रक्षण
त्यांच्या अहोरात्र जगण्याने
भारतीयांना मिळते संरक्षण
जवानांवर होतो कधी हल्ला
त्यात गमावितो आपले प्राण
त्या शहीद जवानांचे शरीर
तिरंग्यात आणले जाते लपेटून
शहिदांचे करून स्मरण
करूया मनोमनी वंदन
जाणीव ठेवू या आपण
व्यर्थ न हो त्यांचे बलिदान
भारतमाता की जयजयकार
करताना स्फुर्ती मिळेल
तिरंगा फडकताना पाहून
गर्वाने मान ही डुलेल
