शेवट
शेवट
वाढ होता होता कधी
होऊ शकते घट
सुरुवात जिथे आहे
असणार तिथे शेवट
शेवट आहे म्हणून
जीवनाला आहे अर्थ
अंतहीन असते तर
असते सगळेच व्यर्थ
या गतवर्षाच्या अखेरीस वाटे मज
शेवट व्हावा दुःखाचा
शेवट व्हावा
आपल्यातील "मी" पणाचा
शेवट व्हावा मनाच्या गाभाऱ्यातील
वाईट विचारांचा
घुसमटलेल्या श्वासांचा
आणि प्रत्येक कुचंबनेचा
शेवट व्हावा
मनावर पडलेल्या प्रत्येक अवर्षणाचा
रागाचा अन् अपमानाचा
शेवट व्हावा मनातल्या
खोट्या भीतीचा
अन् मनावर अधिकार
गाजविणाऱ्या अहंकाराचा
शेवट व्हावा
नकळत घडलेल्या प्रत्येक अपराधाचा
शेवट व्हावा नात्यातील
प्रत्येक चुकांचा
झालेल्या गैरसमजाचा
तेव्हाच होईल
आरंभ नवीन नात्यांचा
कारण शेवट होता होता
होत असते नवी सुरुवात
अंधार्या रात्री नंतर उजळत असते नवी पहाट
