STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Fantasy Inspirational

3  

अमोल धों सुर्यवंशी

Fantasy Inspirational

शेवट हा रुबाबात असेल बघ देवा

शेवट हा रुबाबात असेल बघ देवा

1 min
295

शेवट हा रुबाबात असेल, बघ देवा,

अख्या आयुष्याचा पाळणा झालेला असेल,

वैतागल्याल मन आईच्या खुशीत  शांत झोपेल.

हे सुख फक्त मला भेटल.


अजून दुःख धाडून दे.

परीक्षा घे किंवा शिक्षा दे.

वणवा लाव त्या उभ्या वणव्यात पण मी गारवा शोधेल.


थकलो तरी हाक नाही देणार..

तो दिवस उगवेल तेव्हा सारे प्रतिउत्तर तुझ तूचं दे 

तयार आहेस दुनियाच्या करता करवीत्या.

 

की,होम, हवन आणि मंदिराच्या नादमय

वातावरणात रमला तर नाहीस ना.


अट्या कपाळच्या निशिब लिहित नाहीत.

छोट्या आयुष्याच्या रत्यात खूप काचा ठेचल्यात,

खडयांना भरता भरता स्वतःला त्यात पुरत आलोय 


अजुन उरून पुरल.डगमगलो जरूर

पण कधी हार मानली नाही.

नडतोय लढतोय सतत स्वतःशी भिडतोय 

हा लालची ढेह हार थोडी मानतोय..


शेवट असा असेल.. नक्कीच...

कोणावर भार नसेल,

कमवलेली लोक फक्त सोबत असतील.

कामापुरती पाचतावा करत बसतील..


गाव वाले सजवतील मंडप,

माझ्या नसण्याचे दुःख लपवून,


चार मिनार जुरके घेत बोलावतील किलारी रथ,

पालकी सोहळा असेल, चिल्लर ऐवजी मेव्यातून

नोटा पडतील हमकम,गच्च.

तुझी पुण्याई झाली तर ही कहाणी होहील बिलकुल सच्च.


पोफसात आणि आतड्यात,या काळाची गाट बांधून ठेवल्या.

मरण तर आहे पण जन्म पुन्हा नाही घेणार..कुंट मारून ठेवल्या 


उसण्यावर उपाशी मेला,

जाता जाता चंदनाच्या लाकडात जळला.


दातात सोन्याचा तुकडा नसेल बरा.

पण सोन्या सारखी माणसं आजू बाजूला असतील खरा.


जिवंत पणी वहरपळून निघाला.

हात पसरत होतो तुझ्याकडे तू पाट फिरवलीस.


आता जळत्या लिपटान मध्ये त्याने गारवा शोधला.

निखळ निकाऱ्यांबरोबर,

आता तू  तुझी किमया लपवून ठेव


त्रास नको.नाही तर तुझा दगडाला पाझर फुटेल.

लोटून जातील सगळे तुझा किमयाकार पुरा मध्ये.


हे जगणं तळतळत्या जखमाचे साक्षी असेल.

भोग, भोगावे म्हणून तू जिवंत ठेवलयस,

हा पण तुझा चमत्कार आहे.

तू जगताचा जगजेता आहेस.


खेळ हरलेत कित्येक मी  तरी हारत राहीन 

ती जाग आहे माझी रात्रीच्या काळाला वेड लावणारी 

मर पर्यंत लढत राहीन मी.


कावळा शिवल निवद.

फक्त तो भ्रष्टाचारी नसावा.


कधी बाळघला नाही दुसऱ्या विषय मानात द्वेष.

शेवट हा रुबाबात असेल, बघ देवा,

अख्ख्या आयुष्याचा पाळणा झालेला असेल,

वैतागल्याल मन आईच्या खुशीत कायमच शांत झोपेल.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy