Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Rajendra Udare

Inspirational Others


3  

Rajendra Udare

Inspirational Others


शेतकरी

शेतकरी

1 min 224 1 min 224

रात्रंदिवस करी काळ्याआईची सेवा

नाही करी कधी कोणाचा हेवादावा


हातावर घेऊन भाकरी ठेचा कांदा खाई

आहे त्या परिस्थितीत समाधानी लई


जरी नसली स्वतःला अजिबात शेती 

तरी दुसऱ्या कडे सालधरुन राबती


औतकाठी नांगर बैलांची सावड करी

दुसऱ्यांच्या मदतीला धावे लवकरी


पेरणीच्यावेळेला संशय येई मनात

भेसळ तर नसेल ना या बियाणांत


खतंपाणी व खुरपणीला कष्ट फार

पिकं डोलते काळयाराणी चिकार


बरेचदा आडाणी राहून मुलांना शिकवती

न राबावे मुलांनी या करिता धडपडती


पक्षिअनं गुरं राखणीला माणसांची कमी

मग माणसां परी उभे बुजगावणे डमी


खळं केल्यावर डोक्यात विचार नुस्ता

किती ठेवू घरी किती भरू कर्ज हप्ता


धनधान्य मोंढयावरती विकायला नेती

व्यापारी आडते शेतकऱ्यांना खुप पिळती


राजकारणात योजनांचा भडिमार होतो

लाभ मात्र चाळणीतून पदरी पडतो


निवडणूकी वेळी जाहीरनाम्यात अग्रस्थान

 प्रश्न सोडण्या सत्ताधारी विरोधकात ओढातान


बळीराजा जगाचा पोशिंदा गोष्ट आहे खरी

पण कर्जबाजारीपणाने गळ्यास लावी दोरी


Rate this content
Log in

More marathi poem from Rajendra Udare

Similar marathi poem from Inspirational