(शेतकरी,कामगार,मजूर,कष्टकरी)
(शेतकरी,कामगार,मजूर,कष्टकरी)
लई ,लई जीवाशी खेळतय रं
दादा,लई सारं इपरीत घडतय रं
ऊन,वारा,पाऊस, गारा
सारं शिवार झोडपून काढलय रं
सारं पीक हे तोंडंच गेलंय रं
लई सारं इपरीत घडतयं रं
नियतीचा खेळ,अन बसेना मेळ
भाव पिकाचा नक्की नसतोय रं
मोल कष्टाचं फिटत नाही रं
दादा,जीवन मातीत खपतंय रं
होत्याचं नव्हतं होतय रं
लई सारं इपरीत घडतय रं
उन्हाच्या झळा,मातीचा चटका
जीवाशी सारा बसतोय रं
गरम वार्याची वाफ,अती भयंकर
सपका गरम तोंडाशी बसतोय रं
तसाच जीव हा चालतोय रं
लई सारं इपरीत घडतय रं
हेच जीवन रं माझ्या कष्टकर्याचं
शेतकरी आणि मजूर कामगारांचं
विचार उद्याच्या जगण्याचा करतोय रं
खेड्यातील माणूस खपतोय रं
दादा दिवस रात्र इचार करतोय रं
लई सारं इपरीत घडतय रं
