STORYMIRROR

Umakant Kale

Abstract Others Inspirational

3  

Umakant Kale

Abstract Others Inspirational

शेतकरी जीवन

शेतकरी जीवन

1 min
14.2K


कधी काळी शेतकरी

काळ्या मातीचा तो राजा

सोने पिवळे उगवे 

मनो शिवारी तो राजा

बळीराजा म्हणे शोभे

शान त्यांची अशी भारी

असे कोठार ध्यान्याचे

सुख दु:ख नांदे दारी

आज हरवले चित्रे

बळीराजा झाला दु:खी

बारा विश्वे त्याच्या दारी

अण जग झाले सुखी

 

ओझे वाढे हो कर्जाचे

दोन घास ना हो ओटी

अंगी फाटकी चादर

गरीबीची अशी कोठी

त्याला जगण्यापेक्षा हो

मरणे वाटे ते सोपे

आस न जगी उरली

उध्वस्तास दिसे खोपे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract