शेतकरी दादा
शेतकरी दादा
शेतकरी दादा
शेतकरी दादा
नाही पाऊस नाही पाणी,
सर्वांची तोंड सुकली हिरमुसल्यावानी
शेतकरीदादा
कुठं गेली ती पक्षांची मंजुळ गाणी,
आणि कुठं गेलं ते पाटाचं शुद्ध झुळझुळ पाणी
शेतकरी दादा,
तुझ्यावर असेल थोडं फार कर्ज,
अरे कर्जमाफीचा दे ना एक छोटाच अर्ज
शेतकरी दादा
धरणांचा घास पडला कोरडा,
पाण्यासाठी होत आहे सगळीकडे आरडाओरडा,
शेतकरीदादा
तू सण साजरे केले रक्षाबंधन व नागपंचमी,
पण तू कुठंच नाही पडला कमी,
शेतकरी दादा
तुला वाटलं होत होईल सुगी,
नको रडू उगी, नको रडू उगी.