STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational

3  

Vijay Sanap

Inspirational

शेजारी पाजारी

शेजारी पाजारी

1 min
1.0K


आस पास भोवताली

आहे शेजारी पाजारी

सारे मिळून करतो

आनंदाने कोजागिरी ।।


थाटा माटात करतो

सण एकत्र साजरे

आया बाया आनंदात

माळे केसात गजरे ।।


आली दिवाळी ओवाळी

लाऊ दिवे घरो घरी

बांधू दाराला तोरण

सण उत्सवाचा करी ।।


होळी रंगपंचमीला

खेळे मिळूनिया रंग

जमवून मुले मुली

खेळा मधी होई दंग ।।


करु नका लूडबूड

पोरं सोरं आधी मधी

नाही लेकराचा खेळ

थोर मोठ्या ध्यावी संधी ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational