शब्दफुले
शब्दफुले
व्यक्त होण्या वेचले
मी आज ही शब्दफुले
गंध माझ्या भावनांचा
आसमंती दरवळे
आठवणीच्या मैफलित
कल्पनेचे चांदणे
यातनांच्या तिमिरात
आसवांचे गोठणे
गोठलेल्या आसवांचा
अर्थ कुणा ना कळे
तुझ्याविना व्यर्थ सारे
दुःखाचे सोहळे...
व्यक्त होण्या वेचले
मी आज ही शब्दफुले
गंध माझ्या भावनांचा
आसमंती दरवळे
आठवणीच्या मैफलित
कल्पनेचे चांदणे
यातनांच्या तिमिरात
आसवांचे गोठणे
गोठलेल्या आसवांचा
अर्थ कुणा ना कळे
तुझ्याविना व्यर्थ सारे
दुःखाचे सोहळे...