STORYMIRROR

Umendra Bisen

Classics Inspirational

3  

Umendra Bisen

Classics Inspirational

शब्दांची किमया

शब्दांची किमया

1 min
444

शब्द जोडती माणसे

शब्द देतीया आधार

शब्द जीवनाचे सारं

शब्द करती उध्दार


शब्द देतात सन्मान

शब्द करी अपमान

शब्द हे वापरताना

शब्द आणतात भान


शब्द हे हसवतात

शब्द हे रडवतात

शब्द अश्रु पुसतात

शब्द हे धीर देतात


शब्दातून मिळे ज्ञान

शब्द पेटवीते रानं

शब्द करती कल्याण

शब्दांनाच खरे मान


शब्द किमयाच न्यारी

शब्द जुळवीते यारी

शब्द बनवीते वैरी

शब्द माणसास तारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics