शब्दांचे मोती...
शब्दांचे मोती...
शब्दात शब्द गुंफुनि येते वाक्याला रचना ,
घालुनि थोडे प्रेम त्यामध्ये करु धारना.
करुन गुंफण त्या शब्दांची ,प्रेम असे पांघरु.
शब्दांचे मोती धरुनी ,मायेची आस पेरू
शब्दात असते कठोरता, तर कधी असते प्रेमळता,
शब्द कधी असतात कडू बोल, तर कधी असतात लाडु सारखी गोड..
शब्द जसे की मोत्याची माळा, शब्दातले प्रेम जसे की पवित्र धारा.
कधी कधी वाटते...
,कठोरता एव्हडी
का असावी शब्दांच्या पाठी
काम असल्यावरच का येते नाव आमचे ओठी,
शब्दात शब्द बोलतात पाठी कठोर का रे
बोल तुझे
शब्द बोलतांना नाद जानवे कामपुरते
काम तुझे.
शब्दात असली कठोरता, तर संपतो
मायेचा झरा ,
शब्दात ठेवा मोत्यासारखी सुंदरता,
जीवन होइल अनोखे आणी वाढेल
त्याची किंमत आणी त्याची पारखता...
