STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

शब्द

शब्द

1 min
218

शब्द अस्तित्वात असले तरी

योग्य वेळी जातात रूसून |

पाहिजे तेव्हा ओठांवर येत

नाहीत जातात हसू पुसून | |१


शब्द असतात लाघवी अगदी

काळजात घर करणारे |

शब्द असतात पाशवीसुद्धा

हृदयाला छेद पाडणारे | |२| |


शब्दांचेच धन या जगी मिळवून

देते शब्दप्रभूंना मानसन्मान |

शब्दच होतात कवडीमोल लावती

घालायला चारचौघात खाली मान | |३| |


शब्द असतात भावनाशील

हळूहळू घाव भरणारे |

शब्द असतात कठोर वज्र

एकदम घाव करणारे‌ | |४| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational