शब्द जोडती मने
शब्द जोडती मने
शब्द असतात पूल
माणसांच्या मनातला
दोन मने जोडतात
वेळ द्यावा संवादाला (1)
कुटुंबात सर्वजण
दंग नोकरी धंद्यात
बाहेरुन आल्यावर
मोबाईल हातात (2)
कुचंबणा लहानांची
ज्येष्ठ सदस्यांचीही
आसुसली मने त्यांची
मनमोकळ्या गप्पांसाठी (3)
चला तर एक तास
देऊ कौटुंबिक संवादाला
सर्वजण मोकळे हसू खेळू
उमलवू मनामनाला (4)
