शांतता...
शांतता...
काेणत्याही क्षेत्रात शांतता बाळगणे माेलाची,
थोडी शांतता पाळली तर भाग हाेते सुविचाराची
समजूतदारपणा हेच शांततेचे दुसरं नाव,
शांतता महत्त्वाचे अस्त्र, बदलते आयुष्याचं गाव
शांतता न पाळणारी वळणा वळणावर अपघातग्रस्त,
सर्व काही लगेच हवे, घाईघाईमुळे हाेतात ते त्रस्त
प्रवास आयुष्याचा, शांततेने माणसं हाेतात यशस्वी,
प्रगतीसाठी दाेन पावले मागे घेणारी माणसं तपस्वी
