STORYMIRROR

Manisha Awekar

Inspirational

3  

Manisha Awekar

Inspirational

शान तिरंग्याची

शान तिरंग्याची

1 min
27

तिरंगा प्रिय आम्हांला, सदासर्वकाळ

ध्वज नभी भारताचा, अनंतची काळ   // ध्रु //


रक्त सांडिले भूमीत, स्वातंत्र्य योद्ध्यांनी

ध्वज उभारता होई, हत्त्याच गोळ्यांनी

आज डौलाने फडके, दिली प्राणमाळ   (1)


आँलिंपिकमधी ध्वज, विजयी देशाचा

तिरंगा झळके तिथे, भारत देशाचा

झळकता नभी ध्वज, सफलता माळ     (2)


तिरंगा लपेटून ये, वीरपुत्र घरी

रडतीच धायीधायी, दुःख दाटे उरी

मायबापांच्या आसवा, नसे मुळी खळ    (3)


वीरमरण येता लाभे, पुण्य हो अपार

धडकता वार्ता नसे, शोका पारावार

मान तिरंग्याचा लाभे, जे जिंकिती काळ   (4)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational