STORYMIRROR

Abhishek Gosavi

Drama Romance

3  

Abhishek Gosavi

Drama Romance

सदोष वेळ

सदोष वेळ

1 min
286

बेभान झाला वारा 

जोर आला पावसाला 

खुप वर्षानंतर भेटले 

दोघे एकाच आडोश्याला..


नजरेला भिडताच नजर

त्याचा वाकडा झाला चेहरा

चटकन राग चढला 

तिच्या नाकाच्या शेंड्याला..


पाठीमागे पाठ फिरली

दोन पावले चालत गेली

"नाहीच जरी चुकी माझी

मीच कां म्हणून फिरू माघारी"

 मनात दोघे बोलू लागली.


झाला दृढ निश्चय

अडून बसले दोघेही 

निघून जाईल तो

मान खाली घालून 

ज्याची असेल चुकी

असेल जो अपराधी


पत्रांवरचे पाणी थांबले

पिवळे कोवळे ऊन आले

तिरक्या नजरेने बघता बघता

ठाव मनीचा लागेना 

चुकीचा कोण ते मात्र ठरता ठरेना..


नव्हताच तो चुकलेला

अन तीही होती निर्दोष 

तेव्हा चुकला होता काळ 

अन वेळ होती सदोष


आलेच शेवटी एकत्र 

दुरावा कसा संपून गेला 

दोघे राहिले तसेच तटस्ट

वेळ मात्र निघून गेला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama