चेहरा..
चेहरा..
हलकेच ओंजळीने भरत होते मी सुखस्वप्ने माझी
पान फुले वेली वृक्ष करीत होते हितगुज माझी
चेहर्याच्या तेजाची तुलना होते सूर्याशी
मुक्त स्वछंद हींडू बघत होती ती बहुली
पण काळाची पडली तिच्यावर दाट सावली
कुन्या नाराधामाने बोचला नजरेचा कटाक्ष
चेहरा जळत असताना त्या सुर्याची होती साक्ष
क्षणात आकसुन का जावी ती गालावरची खळी
चुकी नसताना तू पडलिये पुरुषीअहंकारची बळी
फुल होन्याअधि करपली गुलाबाची ती कळी
कुणी तरी सांगा असा कोणता गुन्हा घडला
आयुष्यभारसाठी मात्र चेहरा स्कार्फ मद्येच पडला
