STORYMIRROR

Abhishek Gosavi

Drama Romance Others

3  

Abhishek Gosavi

Drama Romance Others

ती काव्यराणी

ती काव्यराणी

1 min
426

इथे समशेरी यमकांच्या होत्या

बाण शब्दांचे सूटत होते..

समोर उभे काव्यरथी प्रतिस्पर्धी

एक एक करत शरण येत होते....

भिडले जरी अर्थ मनाला

लागले जरी शब्द बाण

घायाळ रसिक वा! वा! करीत होते.....


उरले नव्हते कोणीच आता

हार विजयाचा माझाच होता

शीघ्र काव्य स्पर्धेला कवितांनी 

आता वेगळाच रंग चढला होता...


कुठून अकस्मात आली समोर काव्यराणी

शब्द समशेरीला तिच्या होती धार सुरांची 

उभी ठाकली वाटेकरी, अजून

एक दावेदार माझ्या विजयश्रीची....


सुरु झाले युद्ध पुन्हा

शब्द शब्दांना भिडू लागले

माघार नव्हतीच दोघांच्याही स्वभावात

भाव पणाला लागू लागले...


शेवटी सोडलेच ब्रम्हास्त्र प्रेमकवितेचे 

जे कधी तिच्यावरच होते रचले

ऐकल्यावर कविता लाजून

तिचेही हास्य खुलले.....


आठवून आठवणी निःशब्द झाली

तेव्हा नशिबाने सुद्धा साथ दिली

उघडून ठेवले पुस्तकच समोर

ज्या विषयाचा पेपर होता हाती...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama