STORYMIRROR

Abhishek Gosavi

Romance

3  

Abhishek Gosavi

Romance

तिची कविता

तिची कविता

1 min
200

समजतंच नव्हती तिला कधी ओळ कवितेची,

डोक्यावरून वाहून जायची तिच्या गंगा यमकाची..

ऐकवलीच एखादी कविता तिलाच तिच्यावरची 

डोलावून मान नुसती समजल्या सारखं करायची

काय समजलं विचारल्यावर नाही म्हणून हसायची

चिडून ठरवलं तिने एकदिवशी 

तिलाही माझ्यावर कविता करायची 

जरा धसका खाऊन मनाशी मीही मान डोलावली

बांधून मोकळे केस गच्च वही पेन घेऊन बसली

तासभर बघून डोळ्यात वही मात्र कोरीच ठेवली

अक्षर नव्हते, शब्द नव्हते, नव्हते काही अर्थ;

केलीच नाही तिने यमकाची जुळवा जुळव व्यर्थ

बघता बघता लाजून डोळ्यात माझ्या हरवून गेली 

घेऊन हातात हात खांद्यावरी मान टाकली

अर्थ देवून अबोल भावनांचा 

कविता तीने मुक्यानीच म्हणली......



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance