Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abhishek Gosavi

Drama Tragedy Classics

3  

Abhishek Gosavi

Drama Tragedy Classics

आज तर तुला मानलं पाहिजे

आज तर तुला मानलं पाहिजे

1 min
180


आज तर तुला मानल पाहिजे

मोठ्या उत्साहात देवी बसवतो आहेस

हां आता ही वेगळी गोष्ट आहे की

घरच्या देवीला क्षणाक्षणाला रडवतो आहेस |१|

मोठ्या भक्तिने देवीला सजवतो आहेस


सोन्याचांदीच्या दागीन्यांनी मढवतो आहेस

घरी मात्र लंकेची पार्वती करूँन ठेवली आहेस

यासाठी तर तुला मानलच पाहिजे |२|


दोन्ही हात जोडून मस्तक नमवून

देवीला तू विनवतो आहेस

हां आता त्याला काही फरक नाही पड़त

की घरच्या देवीला शब्दा शब्दाला हिनवतो आहेस |३|


वाघावर बसलेल्या स्त्री चा तू करतोयस आदर

पन गरबा खेळायला आलेल्या

स्त्रीचा तू धरु पाहतोयस पदर

यासाठी तर तुला मानलच पाहिजे

सामान्य देवीच चपलांच वरदान

तुला भेटायलाच पाहिजे |४|


दसऱ्याला म्हणे मोठ्या पराक्रमाने

रावणाला जाळनार आहेस

जरा स्वत:च्या आत डोकावून बघ

तू तर त्यांचा ही बाप आहेस

नऊ दिवसाची नवलाई सोडून

नेहमीसाठी करशील स्त्री चा आदर

तेव्हाच तुला मानल पाहिजे

नाहीतर तुला उलट टांगून हानल पाहिजे |५|


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama