सदिच्छा
सदिच्छा
सदिच्छा
गझल मंथन समूह स्पर्धा
भुजंगप्रयात
कळू दे मनाला तुझा भास होता
कसा अंतरी तो तिचा वास होता
दिसे नेहमी तू सुखी चेहऱ्याने
तुझ्या काळजाला खरा त्रास होता
तिच्या दर्शनाने मिळे क्षण सुखाचे
कसा चेहरा तो मला खास होता
भयानक व्यथांना कसे दाखवावे
अनाथास कोठे मुखी घास होता
कुणाला मिळाली खरी प्रीत येथे
तरी गुंतलेला सखे श्वास होता
