सैनिक मी
सैनिक मी
सैनिक मी देशासाठी
मातृभूमीच्या रक्षणासाठी
सैनिक मी देशासाठी
स्वप्न आम्हां विरांचे
नाहि भित मरणाला
प्रण घेतले रक्षणाचे..!!
धैर्य पराक्रम साहस
शौर्याने लढतो युध्दात
सडा सांडितो रक्ताचा
शञुचा थरकाप उडवीत...!!
भरूनी प्राण उरात
शपथ मातृभूमी ची
रोखूनी श्वास उदरात
सुटका ना करी शञुची..!!
घरदार संसार सोडून
देशाच्या हितासाठी
करितो सर्वस्व अर्पण
मातृभूमी रक्षणासाठी...!!
येवू दे कितीही संकटांना
झेलण्या मी तत्पर
शञुशी दोन हात करण्या
उभा आहे मी रातदिन...!!
