STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational Tragedy

3  

Shila Ambhure

Inspirational Tragedy

सैनिक आम्ही

सैनिक आम्ही

1 min
1.3K


भारत सुंदर

देश आमुचा न्यारा

प्राणाहुनि प्यारा

आम्हासी


सैनिक देशाचे

आम्ही आहोत शूर

शत्रूलाच दूर

पळवितो


रक्षिण्या मायभूला

घेऊन हाती प्राण

करितो रान

जीवाचे


असो हिमवृष्टी

वा रण सहारा

देतो पहारा

सीमेवरी


नकोच पाश

प्रपंच सारा सोडीला

संसार त्यागिला

देशासाठी


जागृत सदा

दिनरात राहतो दक्ष

कर्तव्याकडे लक्ष

अमुचे


पाऊल अमुचे

पुढेच सदैव पडे

शत्रुचा उडे

थरकाप


भ्याड हल्ले

नकाच तुम्ही धाडू

क्षणात काढू

वचपा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational