सावरकर
सावरकर


अखंड हिंदुस्तानाचे स्वप्न पडले होते
धमन्यातील रक्त सळसळले होते
भारतमाता जखडून पडली होती
तिला मुक्त कराया उडी मारली होती
तो सागर धैर्य पाहूनी शांत झाला
अखंड प्रयासाने भारत स्वतंत्र केला
तो त्याग ते बलिदान न विसरू तुमचे
ती हिंदुत्वाची कास स्वप्न भारतभूचे
काव्यप्रभा किती अद्भुत दैवी वरदान
गुणगुणे कविता तुमच्या, तो अंदमान
आजही अखंड तेवत आहे ज्योत विचारांची
आस आहे पुन्हा तुमच्या सान्निध्याची