सावित्रीचे उपकार.
सावित्रीचे उपकार.
चाल : सांग पेंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा...
शिक्षणाचा मार्ग दाविला, दूर केला अंधार....
सावित्रीचे उपकार..किती हे सावित्रीचे उपकार...
अक्षर नव्हते कळत काही
शिक्षणाचा गंधच नाही,
अज्ञानाचा अंधार लई
जन्म सारा वाया जाई.
पहिली शाळा सुरू करूनी,उघडले ज्ञानाचे दार...।।।
कित्येक पिढ्या वाया गेल्या
अज्ञानांने बरबाद झाल्या,
सावित्रीच्या कार्याला या
कोटी कोटी प्रणाम करु या.
अध्यशिक्षीका त्या झाल्या, करण्या आमचा उद्धार...।।
त्याच्यामुळेच शिक्षण हे मिळले
कर्मटांनी त्यांना छळले,
शेण, माती, दगड, चिखल मारले
सोसून अनमोल हे कार्य केले.
केली त्यांनी शैक्षणिक क्रांती, कार्य ते अनमोल फार..।।
शिक्षणा वाचून झाले हाल
शिक्षण देऊन केले भलं,
सावित्रीच्या लेकींनो तुम्हा
सावित्रीने उध्दारीलं
अबला झाल्या सबला आता, झाला खरा उध्दार..।।
