सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले
वसा घेतला शिक्षणाचा
सावित्री स्वतः शिकली
जगाने मानली खरी
स्त्री शिक्षिका पहिली ||
शिक्षणाचे बीज पेरले
साथ दिली ज्योतीबांनी
शिक्षणाचे बांधले बंध
छळ सहन केला सावित्रीनी ||
शेणा- मातीचे गोळे
घेऊनी त्यांनी अंगावर
लोकांचाही रोष झेली
उचले पाऊल शिक्षणावर ||
प्रता रुढीचे बंधन असून
मागे नाही कधी सरली
स्वतः शिकूनी अध्याय
शिक्षिका आदर्श ठरली ||
सावित्रीमुळे सर्वत्र आज
स्त्री घेतेआकाशी भरारी
शिकुनी स्वावलंबी होते
प्रत्येक क्षेत्रात करारी ||
ज्ञानज्योती सावित्रीला
करू या मुजरा मानाचा
कठीण काळीही त्यांनी
दीपक लावला ज्ञानाचा ||
