सावित्री
सावित्री
केले सन्मानित जिने
नारी विश्वास जपले,
माझी सावित्री माऊली
किती अन्याय साहीले..
शेण,दगडाचा मारा
घृणा सोसली यासाठी,
धन्य माऊली आमुची
नित्य खंबीर त्यापाठी..
शिक्षणाची कास धरी
मार्ग जाणिला यशाचा,
पिंजऱ्यात नारीदेह
गर्व नव्हता कशाचा..
उच्च सन्मान मिळतो
आज स्मरते सावित्री,
तिच्या ऋणात राहूनी
वाटे विश्वासाची खात्री..
किती स्मरावे मातेला
मनी मूर्ती तिची छान,
पथ जीवनाचा दिसे
असा मिळाला सन्मान..
