सावित्री ज्योती
सावित्री ज्योती
ना सरस्वतीने केला
ना दुर्गा काली भवानीने
स्त्रीचा उद्धार केला
ज्योतीबाच्या सावित्रीने
दगड गोटे अन शेनाचा मारा
ऊठला जीवावर
परखड रूढीवादी समाज सारा
व्रत शिक्षणाचे जपले तरीही
ध्येय ना ढळले तसूभरही
साथ ज्योतीबाची समर्थ लाभली
शूद्रांसाठी विहिर खुली केली
मुलींसाठी पहिली शाळा
निश्चयाने स्थापन केली
निर्णय वंदय मानुन
पतीला जन्मभर साथ दिली
जाती धर्माच्या पुढे जाऊनी
शिक्षणाची गुढी उभारली
ना कुठली देवी ना कुठला देव कोणता
स्री साठी धावला
तेहतीस कोटी देंवावर
मात करूनी स्त्रीचा खरा उद्धार केला
ज्योत पेटवून शिक्षणाची
समाजात स्रींयाना आणले माणूस म्हणूनी
जगण्याच्या प्रवाहात
पीडयानपीडया माजघरात बुजलेली
बाई पोहोचली मंत्रालयात
या सारयांचे श्रेय स्री म्हणूनी
सदैव सावित्रीज्योती ला देईन
विदयेची देवता म्हणूनी
अखंड सावित्रीच समोर राहिल
ज्ञान ज्योती सावित्री बाई फुले
जयंती विनम्र अभिवादन
