साथ
साथ
तेजोमयप्रकाश ही विशेषता सूर्याची
त्यासाठी सूर्याला हवी साथ प्रकाशाची
सुगंधित दरवळ ही विशेषता फुलांची
त्यासाठी फुलाला हवी साथ परीमळ सुगंधाची
उत्कृष्ट कला ही विशेषता कलाकाराची
त्यासाठी कलाकाराला हवी साथ विविध कलाकृतींची
सखोल ज्ञान ही विशेषता पुस्तकांची
त्यासाठी पुस्तकाला हवी साथ ज्ञानाची
निर्मळ संस्कार ही विशेषता संताची
त्यासाठी संतांना हवी साथ सुसंस्काराची
तसेच चंचल मनाला हवी साथ सर्वज्ञानाची,
सुविचारांची नि कलेची
शांत चित्त विशेषता आनंदी हृदयाची
त्यासाठी हृदयाला हवी साथ शांत, संयमी चित्ताची
प्रेमाची नि सर्वोच्च विचारांची
ओठांवरती स्मितहास्य अन् शांत मन
यांच्या संगतीने सुरू ठेवावी
यात्रा या आनंदमय, रहस्यमय, सुंदर जीवनाची....
