साथ....
साथ....
(सहाक्षरी)
नव्या या वर्षात
असावी ही साथ
तुमची आमची
मिळून साऱ्याची....
कधी ना सुटावी
साथ ही आपली
येवोत कितीही
वादळे संशयी.....
हेवे दावे सारे
दूर ती व्हावेत
निर्मळ ती मने
नव्याने जुळावी.....
दिवस नी रात्र
संगत घडावी
सत्कर्मे व्हावीत
नित्य ती हातूनी....
एकच मागणे
निर्मिका कडे ते
सदा साथ देशी
होवून सावली.....

