STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Romance Fantasy

3  

Bhagyashri Chavan Patil

Romance Fantasy

साथ तुझी माझी

साथ तुझी माझी

1 min
296

साथ होती अवघ्या चार दिवसांची नवीन आपल्या नात्याची

नातं तस नवीनच होतं पण विश्वास होता खऱ्या न होणाऱ्या स्वप्नांची..


प्रत्येकाचे माझ्या आयुष्यात अगदी त्यांची मर्जी सांभाळून स्वागत केलं

आणि पदरी नेहमी दुःखच आल पण आता सवय झाली अश्या वागणुकीची..


जे मनात विचार नसताना ही खरं वाटू लागते ते नेहमीच एका स्वप्नासारखं असतं

कधी वेळ चांगली असली की आयुष्यभर टिकतं नाही तर लगेच तुटून ही जातं..


म्हणून विश्वास ठेवताना नेहमी आपलं ही सुखं बघावं नाही तर शेवटी पचताव लागतं

असं का होतं तर आपला भाव हा निस्वार्थी असतो समोरच्याच्या मनात कपट असतं..


नुसत्या आणा भाका घेवून एकत्र राहता येत नाही तर ते नातं टिकण्यासाठी

कष्ट सोसावे लागतात हे प्रत्येकाला कळायला हवे असे वाटते..

कोणी न कळत चुकलं तर सांभाळून घ्यावं लागतं तर त्या घेतलेल्या आणाभाका

खऱ्या अर्थाने समजून येऊ लागतात त्यासाठी आपले कोणी तरी हवे असे वाटते..


कोणाचीच चूक होत नाही असे या जगात कोणीच नाही

कारण प्रत्येकाला त्याची चूक आणि प्रायश्चित्त हे मिळायला हवं असं मला तरी मनोमन पटते..


दोन्हीकडूनही समान वागणूक मिळायला हवी गप्प राहून गुंता वाढला जातो

आणि आपलं माणूस जवळ असूनही दूरवर कोठे तरी निघून जातो असे दिसायला लागते..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance