साथ पावसाची
साथ पावसाची
सहस्त्र सरींच्या धारधार टोकांचे बाण टोचून गेला
पाऊस आज पुन्हा जाताना रडवून गेला पाऊस
हृदयात खोल दडलेल्या जखमा कुरतडुन गेला पाऊस
कोरड्या डोळ्यांच्या खाचा गच्च भरून गेला पाऊस
चुक पावसाची कुठली!!सारी कळं वेदनांची
भिजल्या मुक क्षणी डोळ्यांनीच दिल्या घेतल्या वचनांची
तु सोडून जाताना आलेल्या प्रलयाची फिकीर नव्हती
जगाची आस फक्त तुला भेटण्याची
विसरून जगाला तुझ्यासवे चालण्याची ओढ तुला ही बेधुंद पावसाची
भिजल्या मिठीला साथ झाडाच्या आडोशाची
साक्षीने याच पावसाच्या शपथा जन्मभर सोबतीच्या घेतल्या होत्यास ना !रे !!
खरं सांग पाऊस पाहताना अजूनही मी तुला आठवते का रे?
