STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational Others

4.0  

Rajendra Udare

Inspirational Others

साप

साप

1 min
398

दिसता क्षणीच

आपणा आठवतो बाप

शेतकऱ्यांचा खरा

मित्र म्हणजेच साप


अनेक किटक

यांचा होतो थरकाप

हा दिसता की

प्राण्यांना भरे ताप


राहायला लागतं

नाही खुराडे झाप

मुंग्याचे वारूळ

आयतं घर आपोआप


सगळेच विषारी

नसतात बरं साप

त्यांना मारून करू

नका हो तुम्ही पाप


जबाबदारीने कर्तव्य

करूयात आपोआप

सर्पमित्रांचे मदतीने

जंगलात सोडावे साप


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational