सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राचे
सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राचे
सण-वार रक्षाबंधन, दिवाळी, दसरा
संक्रांत, अक्षयतृतीया पाडवा हसरा
मराठी भाषेसह खान्देशी अहिराणी
लग्नसमारंभात असती नाच व गाणी
सदरा, धोतर, सहावारी वा नऊवारी
तिर्थयात्रा देवदर्शन पंढरीची ती वारी
भिन्न जात, धर्म, विविध परंपरा जरी
'अतिथी देवोभव' हीच संस्कृती खरी
"वसुधैव कुटुंम्बकम्" शांती समाधान
महाराष्ट्राची ही खरी सांस्कृतिक शान
