STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

सांजवेळ

सांजवेळ

1 min
182

सांजवेळ ही सांगे काही 

गूज तुझ्या-माझ्या प्रीतीचे

मनोमनी रेशीमधागे

गुंफले रेशीमगाठींचे


रवि जाय अस्ताचलासी

प्रभा सोनेरी किरणांची

पक्षी घरट्या परतुनी

ओढ लागते चिमण्यांची


सांजवेळच्या भेटीगाठी

ओल्या शपथा वचनांची

भावपूर्ण स्पर्शबोलीची


मोहमयी प्रेमगारुड

संध्या झुके रजनीकडे

लक्ष चांदण्या नभांतरी

पाऊल वळे घराकडे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract