STORYMIRROR

Manisha Patwardhan

Romance

3  

Manisha Patwardhan

Romance

सांज साजिरी

सांज साजिरी

1 min
188

दिन सारे आठवांचे, मनी दाटे आनंद खरा

मिठीत तुझ्या ऊब घ्यावी, पुन्हा मिळावा सहारा

अशी लागे ओढ मना, शरीरी रोमांच शहारा

अशी असावी सांज साजिरी, असा असावा वारा....


तिच वेळ अन् तोच काळ, पुन्हा पुन्हा तो यावा

पुन्हा जावे जगतात त्या, पुन्हा तो क्षण जगावा

मन धुंद क्षण धुंद, मोद मनाचा हाच न्यारा

अशी असावी सांज साजिरी, असा असावा वारा


तिच पहाट पुनश्च यावी, तोच गंधीत वारा

पक्षांची ती किलबिल, गाती भूप रागाच्या स्वरा

गगनात तेच तारे, तोच मनात शुक्रतारा

अशी असावी सांज साजिरी, असा असावा वारा


मन धुंद धुंद झाले, मी करते तुज इशारा

जवळी यावे कवेत घ्यावे, मोद मनात न्यारा

अशीच यावी वेळ पुन्हा ही, करी मन विचारा

अशी असावी सांज साजिरी असा असावा वारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance