तृषार्त
तृषार्त
1 min
42
कधी क्षितीजावर आसक्त राधा
नित आळवीत एक विरानी
कधी भयभीत विसावलेली
मिठीत राऊच्या कुणी मस्तानी||1||
अवतीभोवती इंद्रधनू राहे
गंधीत रानाच्या क्षितीजावरी
थेंब पाण्याचा अलगद वाहे
पहाडीच्या सुंदर गालावरी||२||
कधी सागरा प्राशून घ्यावे
तृषार्त हृदया घावे चेतन
कधी तिमिरा कापित जावे
वेचून घ्यावा प्रकाश कण कण||३||
क्षितीजावरती सुंदर लहरी
आल्या रविकिरणांच्या
गोड स्वरांनी कोकीळ गाते
स्वागत गीत तयांच्या||४||
किनाऱ्यावर उभे राहून
फेसाळणाऱ्या लाटा पाहाव्या
दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या
कल्पनेच्या नव्या वाटा पाहाव्या||५||