STORYMIRROR

Prashant Kadam

Romance

4  

Prashant Kadam

Romance

मी ओळखून आहे !

मी ओळखून आहे !

1 min
122

मिश्किल बोलणे अन्

बोल खडे सुनावणे

मी ओळखून आहे

प्रिये तूझे हे वागणे 


डोळ्यात तुझ्या का 

निखार जरा नसावा 

उघडताच पापण्या का

राग फुकाचा दिसावा 

अनाकलनीय हे समजणे

मनी राग जरा ही नसणे


केले न प्रेम केंव्हा

त्यांना कसे दिसावे

तुझ्यात गुंतलो मी

मला सहज कळावे

तू ओठ दाबूनी हसता

व्हावे मी शहाणे


दिसता छबी तूझी ग

होते प्रसन्न सारे

फुलती कळ्या फुलांच्या 

वाहती सुगंधी वारे

येवून प्रेम ऊम्हाळे

स्फुरते सुरेल गाण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance