STORYMIRROR

Urmila More

Romance

4  

Urmila More

Romance

चल पुन्हा अनोळखी होऊया...

चल पुन्हा अनोळखी होऊया...

1 min
319

चल पुन्हा अनोळखी होऊया...

चल पुन्हा अनोळखी होऊया..

कोऱ्या कागदावर पुन्हा आपल नशीब लिहूया

एक संधी स्वतः घेऊया

एक संधी देवाला देऊया

या मात्र वेळी नशिबालाच 

त्याचं कोड सोडवायला देऊया..

चल पुन्हा अनोळखी होऊया...

परत एकमेकांना चोरून बघुया

पुन्हा त्या हृदयाच्या ठोक्यांना प्रेमात

धडधडण्याचा भास देऊया..

एकमेकांना दिसलो नाही तर 

तसेच कासावीस होऊया..

आणि दिसताच क्षणी समाधानी होऊया..

चल पुन्हा अनोळखी होऊया..

बुद्धी आणि मनाचं भांडण लावून देऊया..

आणि पुन्हा एकदा मनालाच जिंकवूया..

काही तुटलेली नाती पुन्हा जोडूया..

आणि जोडलेल्या नात्यात पुन्हा 

प्रेमाचे रंग भरुया..

चल पुन्हा अनोळखी होऊया..

त्या समांतर रेषांना एकमेकांत गुंतवून ठेऊया..

लोकं काय म्हणतील? हा विचार जरा बाजूलाच करूया..

आणि बिनधास्त एकमेकांच्या हातात हात घालून चालत राहूया..

लग्नाच्या आधीच्या गमती जमती पुन्हा एकदा अनुभवू या

त्या आपल्यासाठी असणाऱ्या मंगलाष्टकांना पुन्हा एकदा कानावर पडू देऊया..

त्या पवित्र अग्नीच्या भोवती त्याच सप्तपदी पुन्हा घेऊया..

शुभमंगलाचे बोल ऐकत त्या अक्षतांना परत अंगावर घेऊया..

चल पुन्हा अनोळखी होऊया..

आपल्याला एकमेकांमध्ये बांधून ठेवणाऱ्या त्या आठवणींना साठवून ठेवूया..

काठी टेकत टेकत म्हातारं होऊया..

आणि रोज नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडू या..

नव्याने प्रेमात पडण्यासाठी चल पुन्हा अनोळखी होऊया..

पुन्हा पुन्हा नव्याने प्रेम करूया..

आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा अनोळखी होऊया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance