STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

4  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

झाल्या चुका

झाल्या चुका

1 min
197

अजाणता घडल्या चुका माफ तू करशील का? 

बंध तोडून अवघे जवळ तू येशील का? 


पावसाच्या धुंद धारा, भिजून जाते चिंब धरणी. 

भिजविले तिजसी म्हणोनी ती कधी रागवे का? २.                         


दिवसरात्र स्वप्न तुझे चोरूनिया मी बघतो

डोळ्यातील स्वप्न कधी डोळ्यास छेडते का? ३.  


चांदणले वय माझे चकोर मी तहानलेला     

किरणांचे अमृत पी मीच मला विनवू का? ४.                               


राहतील घडत चुका प्रेमबंध बांधतील     

माझ्या मनाचा आरसा तू एकदा होशील का? ५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance