STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

4  

Sakharam Aachrekar

Romance

बहार आयुष्याचा

बहार आयुष्याचा

1 min
381

ऐन श्रावणात बरसला, पाऊस संगीताचा

सये सोबती चिंब, न्हावूयात थोडे


रोज दूर जाण्याचे, आज सोड तू बहाणे

जवळ येऊन दोघे, भांडूयात थोडे


पुरे झाला तुझा तो, लटकाच गे रुसावा

पुन्हा भेटूनी नव्याने, हासूयात थोडे


मनोहर असतील उद्याच्या, सूर्यास्ताचे किनारे

भविष्यात त्या कल्पनांतून, जाऊयात थोडे


आता होतो या तनाला, असह्य या दुरावा

श्वासांना आपल्या समीप, आणूयात थोडे


नाते आपले असेच, आहे जन्मांतरीचे

गुंतवून या हृदयांना राहूयात थोडे


बहरतील इथेच आपल्या, आयुष्याच्या फुलबागा

रंग त्यात इंद्रधनूचे, सांडूयात थोडे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance