गझल-प्रीत
गझल-प्रीत


वृत्त लवंगलता
मात्रा वृत्त ८/८/८/४
प्रेम दावले मी थोडेसे.. म्हणून बसली प्रीती
आनंदाच्या झोपाळ्यावर.. नटून बसली प्रीती
तू राधा मी बासुरी तुझी.. गाणे गाऊ आता
खेळ खेळण्या मस्ती करण्या.. हसून बसली प्रीती
श्रावणात ती भिजली कांती.. जलधारांनी सारी
चिंब भिजूनी वस्त्रे गेली.. रुसून बसली प्रीती
ओल्या अंगी मिठीत घेता.. बावरले मन माझे
ओठी दडले शब्द लाजरे.. दडून बसली प्रीती
हर्ष मनीचा नाही कळला.. शांत मनाची खोटी
सृष्टी सारी रंगीत झाली.. जडून बसली प्रीती
रंगात जीव असा बुडाला.. भान राहीले नाही
प्रेमात अशी नशा चढली.. हरून बसली प्रीती
मी राधा तू असा मुरारी.. यमुना काठी वाटे
धुन बासुरी कानी पडली.. हटून बसली प्रीती