STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

4  

Sakharam Aachrekar

Romance

सांग अनामिक का तेव्हा

सांग अनामिक का तेव्हा

1 min
72

तू स्पर्शिलेल्या रंगीत स्वप्नांची, बाग जेव्हा शिंपतो

सांग अनामिक का तेव्हा, डोळ्यांत तुझ्या मी गुंततो

नेत्रकटाक्षही तुझा पडता होती, भास चांदण्यांचे

रव तुझा ओततो कानी, मकरंद ते फुलांचे

सांजेसरती काठावरती जेव्हा पारिजात तो फुलतो

सांग अनामिक का तेव्हा, डोळ्यांत तुझ्या मी गुंततो

एकांती माझ्या मनमंदिराच्या, कधी तुला मी आठवतो

कवेत तुझ्या सामावलेले, भास जुने आठवतो

शब्दांतून या पृष्ठी थोडे, भाव तुझे सांडतो

सांग अनामिक का तेव्हा, डोळ्यांत तुझ्या मी गुंततो

कळी कोवळी बावरलेली, तुला पाहता फुलते

वेल माझ्या प्रीतीची ही, अंगणी तुझ्या बहरते

हृदयीच्या स्पंदनांत माझ्या, प्रतिमेस तुझ्या पूजतो

सांग अनामिक का तेव्हा, डोळ्यांत तुझ्या मी गुंततो

साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance