STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

4  

Sakharam Aachrekar

Romance

प्रेमवेडा

प्रेमवेडा

1 min
265

पहिल्याच आपल्या भेटीत, अशी निराळी चूक झाली

गुन्हा होता डोळ्यांचा, पण हृदयाला कैद झाली


पाहताच तुला मी होऊन जणू, निष्प्राण गोठलेलो

हरपून भान स्वतःचे, उभा पावसात पेटलेलो


हलकीच तुझीही नजर जराशी, माझ्यादिशेने कललेली

मनी तुझ्याही कळी प्रीतीची, अशी अनामिक फुललेली


परतून मग तू जेव्हा, झालीस माझ्या हवाली

फुले येथली मलाच सारी, दोष देऊन निघाली


तुझ्या डोळ्यांत मी गुंतता, ती रात्र अनोखी सरेना

का होते हे असे, माझे मलाही कळेना


हा सागर म्हणजे ठिकाण आपले, ना सरणाऱ्या गुजगोष्टींचे

साक्ष अजूनही देती गगनी, तारे आपल्या भेटींचे


भविष्यातले भाव सारे, चक्षूंत तुझ्या लोटलेले 

पाहून तुझे ते रूप साजिरे, तुला मी कवेत घेतलेले 


धुंद त्या क्षणापासून आपला, काळ थांबलेला 

तो ही रत पाहण्या दोघांचा, प्रणय रंगलेला 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance