STORYMIRROR

Manda Khandare

Romance

4  

Manda Khandare

Romance

आयुष्याच्या सहवासात

आयुष्याच्या सहवासात

1 min
51

श्रावणसरी सारखा

तू बरसावा पुन्हा

मी चिंब व्हावे तुझ्यात

अन् बिलगावे पुन्हा


ते क्षण ओल्या दवाचे

तू फिरूनी पुन्हा दे मला

त्या श्रावणातील झोपाळ्याचे

गीत तू पुन्हा दे मला


त्या चांदण्या रातीची

भेट पुन्हा हवी मला

त्या नक्षत्रांच्या शपथा

अन् ती चंद्राची साक्ष पुन्हा दे मला


गेल्या अनेक राती 

समीप राहून दूर च्या

परत त्या दे मला आता

त्या माझ्या हळदी च्या अंगा च्या


त्या गोड गुलाबी स्वप्नातूनी

नको जागवूस आता मला

हातात हात दे घट्ट असे

अन् माझे मी पण विसरु दे मला 


तुझा प्रेमळ गुलाबी स्पर्श

आज ही हवा मला 

तुझे बोल ते अमृतचे सख्या

आज ही हवे मला


कोण जाणे उद्याची 

पहाट ती कशी रे

मी रती तू मदन सख्या

जागवू ही मिलन घडी रे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance