प्राजक्ताचा बहर
प्राजक्ताचा बहर
प्राजक्ताच्या फुलांचा दारात पडलाय माझ्या सडा,
फुले वेचण्याच्या बहाण्याने ती येती माझ्या दारा॥
फुलांची रास पाहून हर्ष होई तिच्या मना,
अन् तिला फुले वेचताना पाहून प्रेम पिंगा घाली माझ्या मना॥
तिच्याही नजरेतून सुटली नाही, माझी नजर,
तिनेही नजरेने दिला मला प्रेमाचा गजर॥
चोरट्या तिच्या नजरेने मन होई माझे घायाळ,
बेबंदशाही पणाची मीही आणतो मग खोटी आयाळ॥
तिच्या नजरेने दिला प्रितीचा हा इशारा,
मग, मी ही म्हणालो, होऊन जाऊ द्या आता हा पसारा॥
घायाळ करून गेली मला तिच्या गालावरची खळी,
आता रोजच उमलतीय आमच्या प्रेमाची कळी॥
प्राजक्ताच्या बहराप्रमाने आमचंही आहे सुरू बहरणं,
लोकांनीही सोडलं नाही आमच्या प्रेमाचं हेरणं॥
आता दरवर्षी सगळेच वाट पाहतात प्राजक्ताच्या आगमनाची,
शोधतात आमच्या प्रितीत, त्यांच्या हरवलेल्या प्रेमाची.....!