माणूसपण
माणूसपण


जगण्यासाठी माणसूपणाची खरचं गरज आहे . ॥ धृ ॥
आपल्या नात्यातला फुलोरा आता सुकलायं ,
त्याला आसवांच्या पावसाची गरज आहे .
आसवांचा पाऊस काय असाच पडणार नाही ,
त्याला आत्म्याच्या ओढीची गरज आहे .॥ १ ॥
समईतला दिवाही विझत चाललाय,
त्याला तूपाच्या साथीची गरज आहे .
तूपाचीसाथ ही अशीच मिळणार नाही
तिला वातीच्या आधाराची गरज आहे . ॥ 2 ॥
देवांवरचा विश्वास कमी होत चाललाय ,
त्याला भक्तीची भरज आहे.
भक्ती ही अशीच निर्माण होणार नाही ,
तिला अंतरिक श्रध्देची गरज आहे. ॥ ३ ॥
निसर्गाचा समतोल ढासळत चाललाय ,
त्याला पर्यावरण संवर्धनाची गरज आहे .
पर्यावरण संवर्धन असेच होणार नाही ,
त्यासाठी ग्लोबल वॉर्मिंगची गरज आहे .॥ ४॥
माणसातलं माणूसपण गारठत चाललय ,
त्याला मानवतेचे गरज आहे .
मानवता ही अशीच निर्माण होणार नाही ,
त्यासाठी हृदयात समता जागवण्याची गरज आहे . ॥ ५ ॥