श्रीकृष्ण सखा
श्रीकृष्ण सखा


कोमल राधाराणी सोबती.. श्यामल कृष्णसखा..
रास खेळ रंग रंगला आज.. तो वृंदावनात बघा..
वत्सल राधाराणीचा.. प्रिय पावन कृष्णसखा..
शितल राधेला लाभला.. सावळा कृष्णसखा..
यमुना तटी झुले छान.. कदंब तरुस झोका..
राधा बिलगून बैसे त्यावरी.. सवे कृष्णसखा..
ठेवूनी डोके खांद्यावरती.. चाले राधाच्या गुजगोष्टी..
निजुनी कृष्णाच्या मांडीवर.. ती निहारे निल सृष्टी..
वाजवी सोबती.. मुरली मंजुळ.. मधुर कृष्ण मुरारी..
गोधन पक्षी झाले गोळा.. हर्षे निसर्ग शहारी..
वाहे झुळझुळ यमुनामाई.. संगे वारा गाणे गाई..
नाचती मुरलीवर गोपिका.. पैंजण वाजत जाई..