भाव मनाचे
भाव मनाचे


पाहिले मी लोचनी तुझे भाव काही
एकदा शब्दातून थोडं बोल तू
भान हरवून गेले नयनात तुझ्या
मज मनाचे करशील जरा मोल तू
प्रितीचे शब्द मज हृदयाचे सखे
समीप होऊन हळूच तोल तू
नको आता आढेवेढे खूप झाले
फिरवू नको भोवती गोल गोल तू
प्रेम करतोय तुझ्याशी निरागस मी
समजू नकोस प्रेमाला मज फोल तू